नवी मुंबई - शहरात कोरोनाचा कहर कमी होत नसल्याचे चित्रं दिसून येत आहे. आज एका दिवसांत नव्या 191 कोरोनाग्रस्त रुग्णांनी नवी मुंबईमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा आकडा वाढतंच आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 62 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 5 रूग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गेल्या 5 दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची नवी मुंबईत झपाट्याने होतं आहे. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 745 कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 14 हजार 768 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 612 जण निगेटीव्ह आले असून, 422 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 734 इतकी आहे. आज 191 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील 24, बेलापूरमधील 17, कोपरखैरणेमधील 21, नेरुळमधील 41 , वाशीतील 11, घणसोलीमधील 18, ऐरोलीमधील 46, दिघ्यातील 13 असे एकूण 191 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 77 स्त्रिया व 114 पुरुषांचा समावेश आहे.
नवी मुंबईत कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर आज बेलापूर मधील 3, नेरूळ मधील 13, वाशी मधील 2, तुर्भे मधील 13, कोपरखैरणे मधील 5, घणसोली मधील 7, ऐरोली मधील 14, दिघा 5 अशा एकूण 62 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण 2 हजार 186 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
यामध्ये 23 स्त्रिया आणि 39 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 1 हजार 434 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.