ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत ३८ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १ मृत्यूची नोंद

मुंबईत आज (दि.२५ मार्च) ३८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ७५३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ९२६ रुग्ण बरे झाले आहेत.

mumbai corona
मुंबई कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Mar 25, 2022, 8:43 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची (Mumbai Corona Update) तिसरी लाट आली असून ही लाट आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २४८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

३८ नव्या रुग्णांची नोंद - मुंबईत आज (दि.२५ मार्च) ३८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ७५३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार ९२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १९ हजार ७९२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३८ रुग्णांपैकी ३७ म्हणजेच ९७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार २८० बेड्स असून त्यापैकी २५ बेडवर म्हणजेच ०.१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.९ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८ रुग्णांची नोंद झाली आहे.

४० वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत शून्य सक्रिय रुग्ण - मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. मार्च २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत डिसेंबरनंतर तिसरी लाट आल्यावर धारावीतील रुग्णसंख्या वाढू लागली. तिसऱ्या लाटेदरम्यान धारावीत ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज (२५ मार्च) शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६५२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८२३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.