मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट (Corona Third Wave) आली होती. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. सोमवारी त्यात घट होऊन ९६ रुग्णांची नोंद झाली होती. आज गुरुवारी ११९ रुग्णांची नोंद (Mumbai Corona Update) झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १०८८ सक्रिय रुग्ण आहेत.
११९ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२४ फेब्रुवारीला) ११९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ०७९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३५ हजार ४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०८८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४०१९ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.
९८ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ११९ रुग्णांपैकी ९८ म्हणजेच ८२ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १० रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,२४९ बेडस असून त्यापैकी ७३९ बेडवर म्हणजेच २ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९८ टक्के बेड रिक्त आहेत.
१४ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी व त्यानंतर २३ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत सलग ३ दिवस शून्य रुग्णांची नोंद -
धारावीत आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सलग ३ दिवस शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण ८६४३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.