मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत सलग दोन दिवस 8 हजारांहून कोरोनाची नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज तब्बल 8, 832 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
हेही वाचा-चिंताजनक! मुंबईत महिनाभरात कोरोनाचे ४६ हजार सक्रिय रुग्ण वाढले
58 हजार 455 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 8, 832 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 32 हजार 192 वर पोहोचला आहे. आज 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 724 वर पोहचला आहे. 5352 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 61 हजार 43 वर पोहोचली आहे.
मुंबईत सध्या 58 हजार 455 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 46 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 70 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर 657 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आजपर्यंत 41 लाख 74 हजार 259 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा-धारावीतील कोरोनाला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत ५ हजार रुग्णांची नोंद, ६९४ सक्रिय रुग्ण
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.