ETV Bharat / city

राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ नवीन कोरोना रुग्ण, ७४ मृत्यू

राज्यात आज ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

MAHARASHTRA CORONA
कोरोना
author img

By

Published : Oct 31, 2020, 7:58 PM IST

मुंबई - आज राज्यात ५ हजार ५४८ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज ७४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख १० हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९९ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात एकूण १ लाख २३ हजार ५८५ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण

आतापर्यंत एकूण ४३ हजार ९११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ६७ हजार ४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२ हजार ३४२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २३ हजार ५८५ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या जवळ

राज्यातील कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. तर, कोरोना मृतांची संख्याही घटली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातच ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.