ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : कोरोनाचे 1620 नवे रुग्ण, 36 रुग्णांचा मृत्यू, 1968 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 दिवस तर सरासरी दर 1 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 652 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 872 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 12 लाख 71 हजार 087 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

new 1620 corona positive patient found and 36 coronary died today in mumbai
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Oct 12, 2020, 9:39 PM IST

मुंबई - महानगर मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 1620 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1968 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 1620 नवे रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 30 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष तर 8 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 31 हजार 070 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 466 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1968 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 95 हजार 773 वर गेला आहे. सध्या मुंबईत 22 हजार 693 सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.