मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. त्यातीलच एक म्हणजे मराठी चित्रपट नेबर्स (Neighbors Movie). हा चित्रपट पहिला लॉकडाऊन लागण्याच्या सुमारास प्रदर्शित होणार होता, परंतु सर्व थिएटर्स बंद असल्यामुळे नाईलाजाने बासनात गुंडाळला गेला होता. आता निर्मात्यांनी नेबर्स प्रदर्शित करण्यासाठी कंबर कसली असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Neighbors ready for release) आहे.
जगावेगळी प्रेम कथा 'नेबर्स' - प्रेम आणि ताऱ्यांनी वेढलेल्या, एकाच मार्गाने प्रवास करणाऱ्या दोन शेजाऱ्यांची एक जगावेगळी प्रेम कथा 'नेबर्स'मधून मनोरंजक पद्धतीने सांगण्यात आली आहे. 'कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन' निर्मित आणि 'मिठुवाला प्रौडक्शन्स' यांचे सादरीकरण असलेल्या 'नेबर्स'मध्ये एक रहस्यमय प्रेम कथा चित्रित करण्यात आली आहे. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एक विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा गुंफण्यात आली (Neighbors mysterious love story ready for release) आहे.
या चित्रपटात चेतन चिटणीस, कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जवादे, शैलेश दातार, नेहा बाम , अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत, तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे. तसेच पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.
चित्रपट २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित - श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले ,असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तळकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली (mysterious love story) आहे.
'नेबर्स' हा चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.