ETV Bharat / city

Nawab Malik And Anil Deshmukh : मलिक आणि देशमुख यांच्या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी त्यांना विसरली का ? - Nawab Malik And Anil Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख ( NCP senior leader Anil Deshmukh ) आणि नवाब मलिक ( Nawab Malik ) सध्या तुरुंगात आहेत. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसरला का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष शरद पवार ( President Sharad Pawar ) संपर्कात असतात असे स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आल आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Oct 9, 2022, 2:28 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख ( NCP senior leader Anil Deshmukh ) आणि नवाब मलिक ( Nawab Malik ) सध्या तुरुंगात आहेत. या दोन्ही नेत्यांबाबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही चर्चा दिसत नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसरला का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते. मात्र या दोन्ही नेत्यांच्या मागे पक्ष ठामपणे उभा आहे. त्यांच्या कुटुंबाशी सातत्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष शरद पवार ( President Sharad Pawar ) संपर्कात असतात असे स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आल आहे.

कठीण परिस्थितीत पक्षच त्यांना विसरला का ? महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सत्तेत असताना दोन मंत्र्यांना गंभीर आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं. सर्वात आधी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाखाली ईडीने अटक केली. तर दुसरीकडे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना दाऊदिशी संबंधित व्यक्ती सोबत जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपांवरून अटक करण्यात आली होती. अद्यापही या दोन्ही नेत्यांवर केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर लढा सुरू आहे. हे दोन्हीही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी होते. त्यामधील अनिल देशमुख यांना जवळपास 11 महिने तुरुंगात होत आले आहेत तर तेथेच नवाब मलिक यांनाही जवळपास सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या कठीण परिस्थितीत पक्षच त्यांना विसरला का ? अशा चर्चा अनेक वेळा राजकीय वर्तुळात वर्तवल्या जातात.

दोन्ही नेत्यांच्या कायदेशीर प्रक्रियेवर राष्ट्रवादीचे बारीक लक्ष : अनिल देशमुख यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणांमध्ये ईडी कडून अटक करण्यात आली आहे. याबाबत विशेष सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल टीमचा पूर्ण लक्ष असतं. अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांच्यासोबत सातत्याने संपर्क साधला जातो. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात दर सुनावणीला कोर्टाचा नेमकं काय म्हणणं होतं यावर वकिलांकडून मांडण्यात आलेली बाजू या सर्व गोष्टींवर खुद्द शरद पवार लक्ष ठेवून आहेत. ईडी कडून अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामीनानंतर वकिलांशीही सुप्रिया सुळे यांनी थेट संवाद साधला होता. तसेच इतर आरोपांच्या बाबतीत केव्हापर्यंत दिलासा मिळेल याची चौकशी केली होती. तर तेथेच नवाब मलिक यांच्या कायदेशीर प्रक्रियेवर देखील पवार कुटुंबीयांचं बारीक लक्ष आहे. नवाब मलिक यांचे वकील आम्ही देसाई यांच्यासोबतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल टीमची सातत्याने चर्चा होत असते.

दोन्ही नेत्यांच्या कुटुंबाशी थेट संपर्क : अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर या दोन्ही कुटुंबाच्या थेट संपर्कात पवार कुटुंबीय आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्या थेट संपर्कात आहेत. तर तेथेच नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक जावई आणि भाऊ कप्तान मलिक यांच्याशी सातत्याने पवार कुटुंबीय अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संपर्कात आहेत. यांच्या माध्यमातून सातत्याने नवाब मलिक यांच्या केस मध्ये नेमकी काय प्रगती झाली आहे कायदेशीर बाबी कुठपर्यंत येऊन पोहोचले आहेत याची माहिती घेतली जाते.

अडचणीच्या काळात पक्ष नेहमीच नेत्यांच्या पाठीशी : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठीशी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. केवळ राजकीय सुधापोटी या दोन्ही नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आरोपण खाली गोवण्याचं काम केलं आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला असून लवकरच ते निर्दोष मुक्त होतील असंच नवाब मलिक यांच्या बाबतीतही घडेल. या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबाशी पक्ष सातत्याने संपर्कात आहे. त्यांना हवी ती मदत पक्षाकडून वेळोवेळी केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधतात. त्यामुळे दोन्ही नेत्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आला आहे असा विरोधकांचा आरोप हा खोटा आहे. या आधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही अशाच खोट्या आरोपानखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी ही छगन भुजबळ यांच्या बाबतीत अशाच वावड्या उठल्या जात होत्या मात्र छगन भुजबळ ज्यावेळी निर्दोष मुक्त होऊन बाहेर आले. त्यावेळेस त्यांनी स्वतः पुण्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीय यांनी आपल्या मागे कसे ठामपणे उभे होते हे स्पष्ट केलं होतं. असंच स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या बाबतीत ज्या वावड्या उठत आहेत. त्या पूर्णतः खोट्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ठामपणे या दोन्ही नेत्यांच्या मागे उभे असल्याचंही महेश तपासे यांनी सांगितला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.