मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मुंबईतील वाय बी सेंटर येथे भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मात्र, राजकीय व्यतिरिक्त विविध विषयांवर चर्चा झाल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले ( Home Minister Dilip Walse Patil ) की, आज शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. राज्य गृह विभागाचे मुख्य सचिव आनंद लिमये ( Home Department secretary Anand Limaye ) , मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police commissioner Sanjay Pandey ) उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेतील सगळेच विषय बाहेर सांगता येत नाहीत. कोणत्याच राजकीय चर्चा यावेळी झाल्या नाहीत. काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यातील मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांनी तलवार नाट्य केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना विचारले असता, सध्या काही माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो. मात्र अशा प्रकरणात काही तथ्य असेल तर कारवाई केली जाते, असे वळसे - पाटील म्हणाले.
हेही वाचा-विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
आयपीएलच्या सुरक्षेबाबत शरद पवार यांनी माहिती-
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा होती. गृहमंत्र्यांनी यावर ही भाष्य केले. मुख्यमंत्री नाराज नाहीत, माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी माझं अभिनंदन केल्याचे पाटील यांनी सांगितले. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना, विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नियुक्ती केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र कोणाचीही नियुक्ती कोणाला अडचणीत आणण्यासाठी केली जात नाही, असा खुलासा गृहमंत्री वळसे - पाटील यांनी केला. मुंबईत सुरू असलेल्या आयपीएलच्या सुरक्षेबाबत शरद पवार यांनी माहिती घेतल्याचे मंत्री वळसे - पाटील यांनी सांगितले.