ETV Bharat / city

Amol Kolhe Reacted On Godase Role : राजकारण आणि अभिनयाची गल्लत करू नका - खासदार अमोल कोल्हे

author img

By

Published : Jan 20, 2022, 9:08 PM IST

Updated : Jan 20, 2022, 9:56 PM IST

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) आता पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नथुराम गोडसेची भूमिका केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना, 'कलाकार आणि राजकीय नेता यांच्यात गल्लत करू नका', अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली ( Amol Kolhe Reacted On Godase Role ) आहे.

खासदार अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील ( Why I Killed Gandhi Movie ) भूमिकेमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका ( Amol Kolhe In Nathuram Godase Role ) साकारली आहे. चित्रपटात नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या अगदी परस्पर विरोधी भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारली आहे. याबाबत आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना अमोल कोल्हे यांनी मात्र, 'या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहा' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ( Amol Kolhe Reacted On Godase Role ) आहे.

कथानकाची गरज, विचारधारेशी संबंध नाही- कोल्हे

"एखाद्या चित्रपटाच्या कथानकानुसार अभिनेत्याला भूमिका वठवावी लागते. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या सांगण्यानुसार त्याला काम करावे लागते. कित्येकदा हे काम त्याच्या भूमिकेविरोधात, मनाविरोधात असू शकते. परंतु एक कलावंत म्हणून त्याला काम नाकारता येत नाही. या चित्रपटातील माझी भूमिका ही मी राजकारणात येण्याआधी चित्रित झालेली आहे. त्यामुळे त्या भूमिकेचा माझा राजकारणाशी संबंध जोडला जाऊ नये" असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात जर माझ्या पक्षाने वेगळी भूमिका घेतली अथवा चित्रपटाला विरोध दर्शवला तरीही माझा त्याला आक्षेप असणार नाही, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाडांचा विरोध

अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. 'डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही', अशा शब्दात आव्हाड यांनी त्यांचा विरोध दर्शविला आहे.

  • डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अस्लम शेख यांनी केली पाठराखण

देशात सांप्रदायिकीकरणाचे काम कोण करत असले तर ते भाजप आणि केंद्र सरकार करत आहे. गोडसे तर एक लहान गोष्ट आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून काहीही घडू शकते. मात्र, राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंच्या साकारलेल्या भूमिकेला राजकारणाशी जोडू नका. कलाकाराला पैसे आणि रोल महत्वाचा असतो, असे सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोल्हे यांची पाठराखण ( Aslam Shaikh About Amol Kolhe ) केली.

कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलेच्या दृष्टीने पहा

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारण्याचा विरोध होत आहे. असे असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अमोल कोल्हे यांना पाठिंबा दर्शविला ( Rajesh Tope Supports Amol Kolhe ) आहे. टोपे म्हणाले की, डॉ. कोल्हे एक कलाकार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे कलेच्या दृष्टीने पाहायला हवे.

Last Updated : Jan 20, 2022, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.