ETV Bharat / city

NCP leader demands for reciting namaz : महिलेची पंतप्रधानांच्या निवासाबाहेर नमाज पठणाची मागणी - पंतप्रधानांच्या घरासमोर करणार नमाज पठण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष फहमीदा खान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Lady demands for the reciting namaz ) यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नमाज पठण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

Namaz pathan
Namaz pathan
author img

By

Published : Apr 25, 2022, 11:26 AM IST

Updated : Apr 25, 2022, 11:46 AM IST

मुंबई - राज्यात हनुमान चालीसा पठणवरुन वाद रंगला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Namaz Pathan) यांच्या निवासासमोर नमाज पठण करण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना पाठवल्याने हा वाद चिघळणार आहे.

  • I've asked HM Amit Shah for permission to chant prayers of every religion in front of PM Modi's residence. If Hindutva, Jainism elevates for country's benefit to reduce inflation, unemployment, starvation,I'd like to do it:NCP Mumbai north district working pres Fahmida Hasan Khan pic.twitter.com/QN4rtOheiJ

    — ANI (@ANI) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री घरासमोर नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला. यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांनी या प्रकरणी त्यांची रवानगी तुरुंगात केली. हा वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष फहमीदा खान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, नमाज पठण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे.

गृहमंत्र्यांच्या घरासमोर नमाज पठण करण्याची परवानगी
मी नेहमी हनुमान चालीसा पाठ करते. घरी दुर्गापूजा करते. मात्र देशात ज्याप्रकारे महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागे करणे गरजेचे झाले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्री निवासाबाहेर हनुमान चालीसा पठण करून फायदा होत असेल तर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हितासाठी दिल्लीतील निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा आणि नमाज पठण करण्यास परवानगी द्यावी, मला तारीख आणि वेळ कळवावी असा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
हेही वाचा - Navneet Rana health : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, भायखळा कारागृह रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated : Apr 25, 2022, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.