ETV Bharat / city

'अपनेही जाल में फ---स', राष्ट्रवादीचा फडणवीसांवर निशाणा

महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून सातत्याने वार करणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनेही सोशल मीडियातून प्रत्युत्तर देत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या फेसबूकवरील अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 23, 2021, 5:22 PM IST

'अपनेही जाल में फ---स' राष्ट्रवादीचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसने जप्त केलेली व्होल्वो कार देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या मनिष भतिजा यांच्या मालकीची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीसांवर निशाणा साधला आहे. एटीएसच्या तपासामुळे हे समोर आले असून फडणवीस आपल्याच जाळ्यात अडकल्याचे राष्ट्रवादीने सोशल मीडियातून केलेल्या पोस्टद्वारे सुचविले आहे.

राष्ट्रवादीची फेसबूक पोस्ट
राष्ट्रवादीची फेसबूक पोस्ट

'अपनेही जाल में फ---स'

महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून सातत्याने वार करणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनेही सोशल मीडियातून प्रत्युत्तर देत थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या फेसबूकवरील अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टला जोडलेल्या छायाचित्रावर 'अपनेही जाल में फ---स' अशी ओळ टाकण्यात आली आहे. या छायाचित्रासोबत मोठी पोस्ट टाकत थेट देवेंद्र फडणवीसांवर राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे.

काय आहे राष्ट्रवादीची पोस्ट?

"एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट

महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?

मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर.

मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत." असे राष्ट्रवादीच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादीची फेसबूक पोस्ट
राष्ट्रवादीची फेसबूक पोस्ट

राष्ट्रवादीचा रोख फडणवीसांकडे

मनिष भतिजांचे फडणवीस आणि भाजप नेत्यांसोबत निकटचे संबंध असून हिरेन प्रकरणी जप्त करण्यात आलेली कार त्यांच्या मालकीची असल्याने राष्ट्रवादीने या प्रकरणी थेट भाजवरच संशयाची सुई वळविली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या आरोपांना फडणवीस आणि भाजपकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : फॉरेन्सिकची टीम एनआयए कार्यालयात दाखल, जप्त व्होल्वो कारची तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.