ETV Bharat / city

एनसीबी कडून दीपिकाच्या मॅनेजरच्या घरावर छापा; अंमली पदार्थ जप्त - bollywood drug news

काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा यांच्यातील व्हट्सअॅप चॅट समोर आले होते. त्याआधारे करिष्मा प्रकाश हिच्या घरी एनसीबीने धाड टाकली. यात अमली पदार्थांचा मोठासाठा प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

Deepika Padukon Manager
Deepika Padukon Manager
author img

By

Published : Oct 28, 2020, 7:57 AM IST

Updated : Oct 28, 2020, 10:04 AM IST

मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी एनसीबी ने मंगळवारी छापा टाकला. यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळाल्याची माहिती समोर येत आहे.एनसीबी कडून काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण व तिची मॅनेजर करिष्मा या दोघांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान बॉलिवूडमध्ये सुरू असलेले ड्रग्स सिंडिकेट बाबत त्यांना विचारणा करण्यात आली. अभिनेत्री दीपिका पदुकोण व करिष्मा यांच्या दरम्यान व्हाट्सअॅप चॅट झाले होते. ज्यामध्ये अंमली पदार्थांच्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती.

एनसीबी कडून दीपिकाच्या मॅनेजरच्या घरावर छापा

एनसीबीची करिष्माला नोटीस -

2017 मधील अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि मॅनेजर करिष्मा यांच्यातील व्हट्सअॅप चॅट समोर आले होते. त्याआधारे करिष्मा प्रकाश हिच्या घरी एनसीबीने धाड टाकली. यात अमली पदार्थांचा मोठा साठा प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. छाप्यादरम्यान करिष्मा घरी उपस्थित नव्हती. त्यामुळे तिची चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे एनसीबीने करिष्माला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीने तिच्या घराच्या बाहेर समन्स चिकटवले आहे. त्यानुसार तिला चौकशीसाठी उपस्थित रहावे लागेल. या पुर्वीही तिची एनसीबीने चौकशी केली होती.

या अभिनेत्रींची या पुर्वी झाली होती चौकशी -

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रित सिंग या अभिनेत्रींची चौकशीही झाली आहे. त्यात रिया चक्रवतीला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. त्यात आता दीपिकाची मॅनेजर करिष्माला पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याने दीपिकाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी काही नवे खुलासे होतात का याकडे ही सर्वांच लक्ष असेल.

सुशांतसिंह आत्महत्या आणि ड्रग्ज कनेक्शन

एनसीबी सुशातसिंह आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. त्यानुसार पहिल्या दिवसापासून एनसीबी आक्रमक दिसली आहे. अनेक ड्रग्ज डिलर्सना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यातूनच त्यांचे बॉलिवूड कनेक्शनही समोर आले होते.

Last Updated : Oct 28, 2020, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.