ETV Bharat / city

Cruise Drug Case : ४ जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी - ncb custody news

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.

ncb office
एनसीबी ऑफिस फाईल फोटो
author img

By

Published : Oct 5, 2021, 10:14 PM IST

मुंबई - 'कॉर्डीया द क्रूझ'वर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई केली. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर आज(5 ऑक्टोबर) आणखी चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या १२ झाली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करांचा समावेश असल्याचे समोर आल्याने एनसीबीने आता चौकशीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा - Cruise Drug Case : एनसीबीकडून आणखी 4 जणांना अटक; अटक झालेल्यांचा आकडा 16

  • आर्यन खानला अटक, एनसीबी कोठडी -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा या तीन जणांना तसेच इतर पाच जणांना अशा एकूण आठ जणांना न्यायालयात हजर केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. या आठ जणांची एनसीबीकडून कसून चौकशी केली जात आहे.

  • चार जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी -

एकीकडे एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली जात असताना आणखी काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार अब्दुल शेख, श्रेयस नायर, मनीष दर्या आणि अविन शाहू या चार जणांना एनसीबीने अटक केली आहे. या चौघांना जेजे रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. कार्डिया क्रूझ प्रकरणी याआधी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आता आणखी चार जणांना अटक करण्यात आल्याने अटक करण्यात आलेल्यांचा आकडा १२ वर गेला आहे.

  • पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला -

मिळालेल्या माहितीनुसार, कॉर्डींया द क्रूझवर संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या दिवशी छापा टाकला, त्या दिवशीचा मेनिफेस्टो मागवला आहे. यातून क्रूझवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील, मोबाईल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. क्रूझचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आले आहेत. याशिवाय या क्रूझवर ड्रग्ज डीलर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कॉर्डींया द क्रूझवर 2 ऑक्टोबर झालेल्या पार्टीचा संपूर्ण तपशील एनसीबीने मागितला आहे. याशिवाय क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम यांना पुन्हा समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले आहे.

  • गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत -

कॉर्डींया द क्रूझमधील पार्टीमध्ये ड्रग्स घेतल्याचे समोर आल्यावर एनसीबीने आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. क्रूझवर जे ड्रग्ज आणण्यात आले होते, त्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्टीचे आयोजक व त्यात सहभागी असलेले लोक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अनेक ठिकाणी छापे टाकले जाणार आहेत. त्याची तयारी एनसीबीने केली आहे. त्यासाठी मुंबईमधील एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. एनसीबी अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने देशातील इतर एनसीबी कार्यालयातील अधिकारी मुंबईत बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत.

हेही वाचा - ड्रग्जच्या खरेदीसाठी कोड वर्डचा वापर; आर्यनच्या Whats App चॅटमधून माहिती आली समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.