ETV Bharat / city

सुशांतसिंह राजपूत प्रकरण : एनसीबीकडून हिमाचल प्रदेशमध्ये एकाला अटक - Himachal pradesh drug peddler arrested by NCB

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. राहील हा शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांच्या संपर्कात असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील इतर व्यक्तींच्या संपर्कात राहून अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे काम राहील करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

NCB arrests a person in SSR drug peddling case seizes 1 KG hashish from him
सुशांतसिंह राजपूत प्रकरण : एनसीबीकडून हिमाचल प्रदेशमध्ये एकाला अटक
author img

By

Published : Sep 18, 2020, 10:54 AM IST

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्स सिंडिकेटचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) आणखीन एकाला अटक करण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान राहील विश्राम या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीकडून उच्च प्रतीचे 1 किलो हशीश जप्त करण्यात आले असून, याबरोबरच 4 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात चार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. राहील हा शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांच्या संपर्कात असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबरोबरच बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील इतर व्यक्तींच्या संपर्कात राहून अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे काम राहील करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात असताना श्रुती मोदी आणि जया शहा यांनासुद्धा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या दोघींना एनसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : ड्रग-लिंक्समध्ये नाव आल्यावर रकुलने ठोठावला दिल्ली न्यायालयाचा दरवाजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.