ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले - नवाब मलिक यांचा गंभीर आरोप - रियाज भाटी

आर्यन ड्रग क्रुझ प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वाक्युद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले, की मुन्ना यादव हा नागपूरचा गुंडा आहे. त्यावर अनेक गुन्हे आहेत. राजकीय भीती निर्माण करणाऱ्याला तुम्ही (देवेंद्र फडणवीस) यांनी कन्ट्रक्शनचे अध्यक्ष बनविले

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Nov 10, 2021, 12:04 PM IST

Updated : Nov 10, 2021, 12:26 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विध गुन्हेगारांना फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कसे अभय दिले, याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आर्यन ड्रग क्रुझ प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वाक्युद्ध सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले, की मुन्ना यादव हा नागपूरचा गुंडा आहे. त्यावर अनेक गुन्हे आहेत. राजकीय भीती निर्माण करणाऱ्याला तुम्ही (देवेंद्र फडणवीस) यांनी कन्ट्रक्शनचे अध्यक्ष बनविले. तुमच्या गंगेत तो पवित्र झाला का ? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले

हेही वाचा-क्रांती रेडकरच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात तक्रार, मलिकांनी केले होते 'हे' आरोप

हैदर आझम याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तो इतरांना मुंबईत वास्तव्य देतो. यावर मालाड पोलीस कारवाई करत होती. तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला. त्यानंतर प्रकरण दाबले गेले. तुमच्या काळात लोकांना अंडरवर्ल्डचे धमकीचे फोन यायचे. जमिनी नावावर करून घायचे. पोलीस प्रकरण दाबले जायचे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा-'उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक्त आ गया है'; नवाब मलिक यांचे सूचक ट्विट

नोटाबंदी झाल्यावर अनेक ठिकाणी खोट्या नोटा होत्या. 8 ऑक्टोबर 2017 रोजी बीकेसीमध्ये 14 कोटी 56 लाख रुपयांच्या नकली नोटा चापेमरीत पकडल्या होत्या. फडणवीस यांनी फोन करून ते प्रकरण दाबले होते. 8 लाख 80 हजार एवढी रक्कम सांगत ते प्रकरण दाबले गेले. एनआयएला प्रकरण दिले नाही. नोटा कुठून आले, याचा शोध घेतला गेला नाही ? कोणाच्या आशीर्वादाने सगळे झाले. हाजी अरफाज शेख याला फडणवीस यांनी भाजपच्या अल्पसंख्याक आयोग बनवून अध्यक्ष बनविले. अनेक गुंडांना अध्यक्षपदावर बसवून राज्यभरात वसुली करत होते. हे सगळे फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुरू होते, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते मलिक यांनी केला.

हेही वाचा-फडणवीसांनी 'या' लोकांच्या मदतीने वसुलीचे रॅकेट चालवले, मलिकांचा गंभीर आरोप; पहा मलिकांची पत्रकार परिषद

रियाज भाटी कोण आहे ?

रियाज भाटीला 2 पासपोर्टसह पकडले गेले. त्याला 2 दिवसात त्याला कसे सोडले? त्याचे अनेक फोटो फडणवीस यांच्यासोबत आहेत. जेवणाच्या टेबलवरदेखील त्यांचे फोटो आहेत. रियाज भाटी याचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतदेखील आहेत. त्याचे नाव नकली नोटांमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता. समीर वानखेडे यांची मदत घेत फडणवीस यांनी प्रकरण निकाली काढले. रियाज भाटी हा फरार आहे

नकली नोटा पाकिसमधूनमधून आल्या का ? वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कोणाच्या नावावर आहे. बीकेसीमध्ये कोणाच्या नावावर फ्लॅट आहे? तिथे कोण राहते अशा विविध प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली.

Last Updated : Nov 10, 2021, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.