ETV Bharat / city

Nawab Malik Receives Threat Letter : नवाब मलिक यांना धमकीचे पत्र, पत्राची तक्रार गृहमंत्र्यांकडे - दिलीप वळसे-पाटील

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना धमकीचे पत्र (threatening letter) आले आहे. या पत्रात अर्वाच्च भाषेचा वापर केलेला आहे. मलिक यांनी याबाबतची रीतसर तक्रार राज्याचे गृहमंत्री(state Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्याकडे केली असून या पत्राबाबत गांभीर्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 14, 2021, 3:44 PM IST

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात अर्वाच्च भाषेचा वापर केला असून, नवाब मलिक यांच्या कुटुंबियांना देखील या पत्रातून धमकी देण्यात आली आहे. या पत्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही उल्लेख असून त्यांनाही धमकी दिल्याची माहिती आहे. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ही अर्वाच्च भाषेचा वापर करून त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. हे पत्र अभिजीत बनसोडे नामक नौदलातील एका अधिकाऱ्याने मुंबईतील कप परेड या परिसरात लिहिले असल्याचा पात्रात उल्लेख आहे.
नवाब मलिक गेल्या काही दिवसापासून सातत्याने एनसीबी अमली पदार्थ विरोधी पथक याचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत.
या आरोपांबाबत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची माफी मागावी असे पत्रामध्ये नमूद करण्यात आल आहे. हे पत्र मिळाल्यानंतर मलिक यांनी याबाबतची रीतसर तक्रार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली असून या पत्राबाबत गांभीर्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.