ETV Bharat / city

Nawab Malik granted bail : मानहानीच्या खटल्यात शिवडी न्यायालयाकडून नवाब मलिक यांना जामीन मंजूर

nawab malik
नवाब मलिक
author img

By

Published : Jan 12, 2022, 5:18 PM IST

Updated : Jan 12, 2022, 7:58 PM IST

17:15 January 12

नवाब मलिक यांना शिवडी कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

मुंबई - भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याशी संबंधित सुनावणी आज (12 जानेवारी) शिवडी दंडाधिकारी न्यायालयात झाली. यावेळी नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला (Bail Granted) आहे.

पुढील सुनावणी 29 जानेवारीला

सुनावणीवेळी नवाब मलिक हे प्रत्यक्ष न्यायालयासमोर उपस्थित होते, तर मोहित कंबोज हे ऑनलाईन पद्धतीने हजर होते. मोहित कंबोज यांचे वकील प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. नवाब मलिल यांनी शिवडी येथील न्यायालयात मोहित कंबोज यांच्याशी संबंधित एक मानहानी प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने मंजूर करत नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.

मोहित कंबोज यांच्याबद्दल मानहानीकरक वक्तव्य करण्यास नवाब मलिक यांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच न्यायालयाची अवमान केल्यास तक्रारदारास म्हणजेच मोहित कंबोज यांना जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी होणार आहे.

Last Updated : Jan 12, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.