मुंबई - राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी आमच्या आघाडीची मागणी राहणार आहे. त्यासाठी एक - दोन दिवसात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. त्याशिवाय राज्यात कारखानदारी बंद होवून बेरोजगारी वाढत आहे. या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आणि त्यावर काय उपाय योजना करता येईल याबाबत आघाडीच्यावतीने राज्यपालांची भेट मागण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.