मुंबई - देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. सत्तेत येण्यासाठी ज्या आणाभाका घेतल्या, त्याच आज फोल ठरू लागल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छेडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण होणार आहे.
अब की बार...
आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात पेट्रोल - डिझेलच्या मुद्द्यावर भाजपाने निवडणूक लढवली. अब की बार मोदी सरकार बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळात भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी मेरे नशीबसे दाम कम हो रहे है, तो विपक्ष को क्यू बुरा लगता है आपको नशीबवाला चाहिए की बदनशीबवाला चाहिए असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते. दरम्यान हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
मोदींनी उत्तर द्यावे
मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने. कोण बदनशीब आहे देशातील जनता की तुम्ही याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे, अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.