मुंबई - नवाब मलिक यांच्याकडून ड्रग्स प्रकरणांमध्ये थेट देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्यामध्ये होणाऱ्या ड्रग्सच्या व्यापाऱ्यांमध्ये भाजपाचे नेते क्लीन आल्याचा दावा नवाब मालिकांकडून पत्रकार परिषदेतून केला जात आहे. नवाब मालिकांच्या या भूमिकेचे समर्थन मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने देखील केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नवाब मलिक अजूनही आक्रमक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
नवाब मलिक अजूनच आक्रमक होणार ? राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे रोज ड्रग्स प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावरच्या नेत्यांवर आरोपाच्या फेर्या चढवत आहेत. ड्रग्स प्रकरणांमध्ये थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. मात्र, नवाब मलिकांनी ज्या प्रकारे ड्रग्स प्रकरणांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा सहभाग असल्याचा दावा केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांच्यामागे उभे राहात नवाब मलिक यांनी अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाची पोलखोल करत राहण्याचा सल्ला मंत्रिमंडळाने दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.नवाब मलिक अजूनच आक्रमक होणारराजस्थानमध्ये नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत संपूर्ण भारतीय जनता पक्षाला चिथवलं आहे. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नवाब मलिक यांना मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने दिलेल्या पाठिंब्यामुळे नवाब मलिक पुढेही ड्रग्स प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा संबंध आहेत का ? याचा शोध नक्की घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच भाजपवर आक्रमण करतील असेही मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ड्रग्स प्रकरणावरून सुरू झालेली ही राजकीय लढाई आता वैयक्तिक पातळीवर देखील पोचली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय लढाई पेक्षा ही लढाई वैयक्तिक पातळीवर जास्त लढली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अजय वैद्य म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सूचक ट्विट देवेंद्र फडणवीस यांचे सूचक ट्विट
नवाब मलिक यांच्या खळबळजनक आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर उत्तर देणे टाळल. मात्र ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नवाब मलिक त्यांना उत्तर दिले. "आपण डुकरा सोबत मस्ती करू नये, डुकरा सोबत मस्ती केल्यास आपला अंगावर चिखल उडतो" असे सूचक ट्विट देवेंद्र फडणीस यांनी केलं होतं.
हेही वाचा - Baalveer :शौर्य आणि धाडसाचे प्रतिक आहेत आद्रिका आणि कार्तिक; जाणून घ्या ग्वाल्हेरमधील भाऊ-बहिणीची कथा