मुंबई - नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात ( Nawab Malik Bail Application ) आला आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवाब मलिकच्या जामीन याचिकेवर ईडी सोमवारी उत्तर दाखल करणार आहे. न्यायालयाने ईडीला सोमवारी उत्तर देण्यास सांगितले होते. किडनीच्या त्रासामुळे मलिकच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली आहे. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल ( Malik bail application for medical surgery ) केला आहे.
23 फेब्रुवारी रोजी झाली होती अटक - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी वैद्यकीय प्रक्रियेसाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ईडीला सोमवार पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टाने आज दिले आहे. कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सोबत झालेल्या आर्थिक व्यवहारात प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.
वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज - नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात किडनीच्या शस्त्रक्रिया करीता जामीन अर्ज दाखल केला आहे. आज झालेल्या सुनावणी वेळी मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला जामीन अर्जावर सोमवार पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी ईडी कडून करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना कुठलाही अंतरिम दिलासा दिला नव्हता. तर रेगुलर सुनावणी केल्यानंतर याचिकेवर निर्णय देण्यात येईल असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने म्हटले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी देखील नवाब मलिक यांना कुठलाही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी आता वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा - Mohan Bhagwat : 'भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा, देशात सिंधी विद्यापीठ व्हावे'