ETV Bharat / city

Navneet Rana Spondylosis Pain : खासदार नवनीत राणा जेजे रूग्णालयात दाखल; तुरूंगात कंबरदुखीचा त्रास झाल्याची तक्रार - Mumbai session court Rana case

तुरूंगात असलेल्या खासदार नवनीत राणा यांना कंबरदुखीचा त्रास सुरू ( back pain of Navneet Rana ) झाल्याने त्यांना जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी आणले आहे.

खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : May 4, 2022, 10:09 AM IST

Updated : May 12, 2022, 5:53 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा यांना ( Navneet Rana admitted to JJ Hospital ) कंबरदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे सकाळी भायखळा जेल मधून जेजे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. आता जामिनासाठी राणा दाम्पत्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर निकाल येणार आहे.

Jailed MP Navneet Rana admitted to JJ Hospital due to low back pain. Police have brought him for treatment this morning.

स्पॉंडिलायसिसचा त्रास - नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर ग्राहकाला जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यापासून त्यांना स्पॉंडिलायसिसची ( Navneet Rana suffering from spondylosis )त्रास होत आहे. त्यासंदर्भात जे जे रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र जेल प्रशासनाने सिटीस्कॅन केले नसल्याने त्या संदर्भात त्यांनी जेल प्रशासन आणि लोकसभा अध्यक्ष यांनादेखील वकिलांमार्फत पत्र पाठवले होते. त्यानंतर आज त्यांना कमी त्रास होत असल्याने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Matosharee-Hanuman Chalisa row | Independent MP Navneet Rana leaves from Byculla Jail, Mumbai.

    Navneet and her husband Ravi Rana were released on bail by the sessions court with conditions, today. pic.twitter.com/4wG6JOKn82

    — ANI (@ANI) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लोकसभा अध्यक्षांना पत्र - नवनीत राणा यांच्या वकिलांनी तक्रार भायखळा जेलच्या अधीक्षकांना यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्यानं आणि झोपण्यामुळं ही समस्या वाढत आहे. यामुळं नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात घेऊन गेले. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितलं होतं. मात्र ते अजून केलेलं नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासलं आहे. सीटी स्कॅन न केल्यानं उपचार काय करायचं हे ठरवू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला मात्र त्यावर विचार केला गेला नाही. जर त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार आपण असाल असंही आम्ही सांगितलं आहे, असं पत्रात म्हटलं आहे. हीच तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पाठवली आहे.

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज फैसला - राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालय ( Mumbai session court Rana case ) निकाल देणार आहे. यापूर्वी राहणार दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. सोमवारी निकाल येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र सोमवारी वेळेअभावी निकाल पूर्ण लिहू शकले नसल्यामुळे देण्यात आला नव्हता. त्यामुळे चार मे रोजी निकाल देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे राणा दाम्पत्य यांना आज दिलासा मिळतो की जेलमधील मुक्काम वाटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17 तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला आहे. दरम्यान शनिवारच्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याच्या कोठडीत न्यायालयाकडून आजपर्यंत 4 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केल्यानंतर वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता. त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर 30 एप्रिलला त्यांच्या जामीनावर सुनावणी घेण्यात आली. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आजही वेळेअभावी जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही.

हेही वाचा - मनसे आंदोलन : अजान पठणासह हनुमान चालीसाला मुंबईसह राज्यात संमिश्र प्रतिसाद

हेही वाचा - Rana Couple Bail : राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला; 'या' दिवशी होणार सुनावणी

Last Updated : May 12, 2022, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.