ETV Bharat / city

नौदलाच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Jun 7, 2021, 1:24 PM IST

Updated : Jun 7, 2021, 5:38 PM IST

31 वर्षीय या अधिकाऱ्याने तक्रारदार पीडित महिलेला लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी हॉटेल आणि नौदलाच्या युद्धनौकेवर नेऊन सतत बलात्कार केला होता. याबरोबरच पीडित महिलेकडून त्याने टप्प्याटप्प्याने 2 लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई- लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नौदलाच्या एका अधिकाऱ्या विरोधात वीपी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भातील पीडित तक्रारदार महिलेने आरोप करताना म्हटले आहे की नौदलाचा अधिकारी लग्नाचे आमिष देऊन सतत तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच त्याने आतापर्यंत तिच्याकडून 2 लाख रुपये घेतले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात फसवणुकीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युद्धनौकेवर करत होता बलात्कार - पीडिता

भारतीय नौदलामध्ये कार्यरत असलेल्या 31 वर्षीय या अधिकाऱ्याने तक्रारदार पीडित महिलेला लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी हॉटेल आणि नौदलाच्या युद्धनौकेवर नेऊन सतत बलात्कार केला होता. याबरोबरच पीडित महिलेकडून त्याने टप्प्याटप्प्याने 2 लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आरोप करण्यात आलेला नौदल अधिकारी हा सध्या दिल्लीत कार्यरत असून यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नौदलाशी संपर्क साधून सदरच्या अधिकाऱ्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सोशल मिडीया साईट्सवरुन झाली मैत्री
या प्रकरणातील पीडित महिलेची मैत्री सोशल साईट्सच्या माध्यमातून नौदल अधिकाऱ्याशी झालेली होती. यानंतर या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक देऊन संवाद वाढवला असता, त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते.

Last Updated : Jun 7, 2021, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.