ETV Bharat / city

धारावीच्या साई रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास स्थानिकांचा विरोध - hospitals in dharavi

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच धारावीतील एका खासगी रुग्णालयात आयसोलेशन विभाग सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

dharavi news
धारावीच्या साई रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास स्थानिकांचा विरोध
author img

By

Published : Apr 6, 2020, 7:24 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच धारावीतील एका खासगी रुग्णालयात आयसोलेशन विभाग सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.

धारावी, वरळी कोळीवाडा या झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर खबरदारी म्हणून धारावीतील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. पालिका देखील विविध उपाययोजना करत आहे. मात्र,धारावीतील साई या खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्ष तयार करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.

धारावीत आतापर्यत कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना जवळच सर्व सोयी उपलब्ध करण्याच्या हेतूने पालिकेने खासगी रुग्णालयात देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी साई रुग्णालयात कोरोनाच्या चाचण्या होणार आहेत. तसेच येथे आयसोलेशन वॉर्ड देखील असणार आहे. मात्र याठिकाणी 300 खासगी रहिवासी सदनिका आहेत. त्यामुळे स्थानिकांनी विरोध दर्शवलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.