मुंबई - केंद्र सरकाने अंतिम वर्षातील परिक्षा रद्द न करता ती लेखी व अॉनलाईन पद्धतीने घेण्याचं परिपत्रक नव्याने काढले आहे. याच्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करत केंद्र सरकार आणि युजीसी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी संघटने फाडत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अंतिम वर्षातील परिक्षा रद्द करण्याची मागणी केली.
देशभरात कोरोना संकट असताना महाराष्ट्रासहीत अन्य राज्यातही कोरोनाचे रूग्ण विक्रमी वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे इतर राज्यप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.
परंतू दिनांक ७ जुलैला केंद्र सरकाने अंतिम वर्षातील परिक्षा रद्द न करता ते लेखी व अॉनलाईन पध्दतीने घेण्याचं परिपत्रक नव्याने काढल्याने याच्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून या निर्णयाचं निषेध करत केंद्र सरकार आणि युजीसी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.
देशभरात कोरोनाच संकट असताना केंद्र सरकारला याबाबत गांभिर्य नसून हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे युजीसीने घेतलेल्या निर्णयाने राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकारने जाणिवपूर्वक युजीसीला पुन्हा परीक्षा घेण्यासाठी भाग पाडले असल्याचा आरोप, मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतीलचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी केला.