मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आज बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि 'क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांची चौकशी केली. या दोघांना पुन्हा उद्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) चौकशीसाठी बोलावले आहे.
दुसरीकडे, एका बड्या अभिनेत्रीची मॅनेजर करिश्मा प्रकाश आज चौकशीत गैरहजर राहिली. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आता पुन्हा करिश्मा प्रकाश यांना बोलवणार आहे. एनसीबीने आरोपित ड्रग्स संबंधित व्हाट्सअप्प चॅट संदर्भात साहाची चौकशी केली.
एनसीबीने या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती , रियाचा भाऊ शौविक, सुशांतचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि इतर अनेकांना अटक केली आहे. सुशांतसिंह राजपूत 14 जूनला वांद्रे येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृत आढळला होता. सीबीआय आणि ईडी व्यतिरिक्त एनसीबी ही या प्रकरणाची चौकशी करणारी तिसरी एजन्सी आहे. दरम्यान, एनसीबीच्या तपासणीत ड्रग्स अँगलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर येऊ शकतात.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : जया साहाची नारकोटिक्स ब्युरो करणार सलग तिसऱ्या दिवशी चौकशी - जया साहाची नारकोटिक्स ब्युरोकडून चौकशी बातमी
एनसीबीने या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती , रियाचा भाऊ शौविक, सुशांतचे घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि इतर अनेकांना अटक केली आहे. एका बड्या अभिनेत्रीची मॅनेजर करिश्मा प्रकाश आज चौकशीत गैरहजर राहिली. जया साहा आणि ध्रुव चितगोपेकर यांना उद्या पुन्हा एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे.
![सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : जया साहाची नारकोटिक्स ब्युरो करणार सलग तिसऱ्या दिवशी चौकशी narcotics bureau summoned tomarrow third day of enquiery for jaya saha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8901145-877-8901145-1600794157276.jpg?imwidth=3840)