मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 2016-17 मध्ये माझा फोन टॅप झाल्याचे मला एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समजले होते. माझा फोन अमजद खान या नावाने टॅप झाला होता, असे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - 'राहुल गांधींमध्ये पीएम नाही, तर प्यून बनण्याची क्षमता'; भाजपाच्या आमदाराची टीका
दरम्यान, नारकोटिक्सबाबत संबंध दाखवून त्यांची परवानगी घेण्यात आली होती असे दाखवण्यात आले होते. त्याच काळात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅपिंग झाले असल्याचे त्या माध्यमातूनच मला कळले होते. या बाबतीत शासनाने कारवाई करावी. हा व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे, त्यामुळे संबंधित लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : लसीकरणासाठी नाव नोंदवत आहात..? तर व्हा सावधान