ETV Bharat / city

Fact Check : राणीबागेचे नाव बदलल्याच्या अफवाच! - नितेश राणे

मुंबईतील ( Mumbai ) बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेचे ( Rani Baug ) नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे झाल्याची माहिती सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल (Viral) झाली आहे.

Rani Baug
राणीबाग
author img

By

Published : Dec 22, 2021, 6:08 PM IST

मुंबई : मुंबईतील ( Mumbai ) बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेचे ( Rani Baug ) नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे झाल्याची माहिती सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल (Viral) झाली आहे. राणीबागेत ( Rani Baug ) गेले कित्येक दशकं असलेल्या दर्ग्याच्या नावाचा फलक नवा लावण्यात आला आहे. त्यावरून काही लोकांनी राणीबागेचे ( Rani Baug ) नाव बदलल्याची सोशल मीडियावर ( Social Media ) अफवा पसरवली. याबाबात कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता भाजपाने ( Bjp ) महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर ( Shiv Sena ) टिकास्त्र डागले आहे. परंतु, राणीबागेचे ( Rani Baug ) नाव बदलल्याची अफवा असल्याचे समोर आले आहे.

Rani Baug
राणीबाग

राणीबागेतील दर्गा जुनाच

इंग्लंडच्या राणीसाठी ( England Queen ) मुंबईच्या भायखळा येथे हे खास उद्यान बनवण्यात आले असून, त्याची निर्मिती १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात झाली. यामध्ये प्राणी पक्षी आणि विविध प्रकारची झाडे आहेत. इंग्लंडच्या राणीसाठी ( England Queen ) हे उद्यान बनवले असल्याने या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ ( Victoria garden ) असे होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नामांतर ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ ( Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo ) असे करण्यात आले. त्याच बागेत गेले कित्येक दशके ‘हजरत हाजी पीर बाबा' यांचा दर्गा आहे. ‘हजरत हाजी पीर बाबा' राणी बागवाले म्हणून त्याची ओळख आहे. सध्या राणीबागेचं सुशोभीकरण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत दर्ग्याचा नामफलक नव्याने लावण्यात आला आहे. या नाम फलकाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करुन राणीच्या बागेचे नाव बदलण्यात आल्याची अफवा पसरवली.

Rani Baug
राणीबाग

नाव बदलले नाही; प्राणिसंग्रहालय संचालक

यासंदर्भात प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुळात उद्यानाचे नाव राणी बाग ( Social Media ) नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय ( Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo ) असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग ( Rani Baug ) म्हणून संबोधत आले आहेत. त्यावरून जिजामाता उद्यानातील या जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे.

Rani Baug
राणीबाग
राजकीय पोळी भाजण्याचं काम

"उद्यानाचे नाव बदलले असल्याचे सांगणारे व्हायरल दावे खोटे आहेत. राणीबागेत ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा अनेक वर्षांपासून आहे. या दर्ग्यात हिंदू मुस्लिम सर्वच लोक माथा टेकतात. त्यामुळे या सौहार्दाच्या ठिकाणास उगाच धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचं काम विरोधक करत आहेत. उद्यानाचे नाव वीरमाता जिजाऊंच्या ( Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo ) नावेच आहे आणि भविष्यात राहील यात कुठलाही बदल झालेला नाही," अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Bmc Mayor Kishori Pednekar ) यांनी दिली.

नितेश राणे यांनी केली टिका

मुंबईचं पश्चिम बंगालीकरण करणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, असा चिमटा काढत आमदार नितेश राणे ( Mla Nitesh Rane ) म्हटलं की, "आधी हिंदू सणांना संपवणं, हिंदूंची गळचेपी मुंबईत करणं, आता तर ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॉंसाहेब यांच्या नावालाच पुसण्याचं काम या निर्लज्ज शिवसेनेच्या सत्तेमध्ये असलेल्या महापालिकेनं केलं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. ज्या शिवराय आणि भगला झेंडा घेऊन ते राजकारण करतात आणि स्वत:चा पक्ष वाढवतात त्या जिजाऊंचंच नाव पुसण्याचं काम शिवसेना आणि मुंबई महापालिकेनं ( BMC ) केलं आहे. त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. कारण मुंबईत हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर शिवसेना मुक्त केल्याशिवाय शक्य नाही", अशी टिकाही त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.