मुंबई - मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात बेडची संख्या, रुग्णसंख्या, निर्माण केलेले नवीन वॉर्ड, उपलब्ध केलेल्या सोयी या प्रमाणात परिचारिकांची 1648 पदे भरण्याची आवश्यकता आहे. ही पदे आस्थापना सूचीवर निर्माण करून त्वरित भरावीत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास येत्या 1 मे पासून संपावर जाणार असल्याचा इशारा युनियनने दिला आहे.
'परिचरिकांची पदे निर्माण करा' : बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयालातील जुन्या इमारतीत, नवीन इमारतीत, शस्त्रक्रिया विभागात, रुग्णशय्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. रुग्णालयात 1648 पदांची आवश्यकता असताना 688 पदे मंजूर आहेत. प्रत्येक 2 परिचारिकेला 5 परिचरिकांचे काम करावे लागत आहे. याचा परिणाम परिचारिकांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यावर होत आहे. परिचरिकांची संख्या कमी असल्याने आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. याबाबत युनियने रुग्णालय प्रशासनाला 30 डिसेंबर 2021 ला पत्र दिले आहे. त्यानंतरही हृदय विकाराचा आयसीयू विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे. त्याकरिता आवश्यक मनुष्यबळाची व पदांची निर्मिती केलेली नाही. यामुळे परिचारिका आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाल्याचे पत्र युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त व रुग्णालयाचे डीन यांना पत्र दिले आहे.
'...अन्यथा 1 मे पासून संप' : नायर रुग्णालयात नव्याने सूरी करण्यात येत असलेल्या हृदय विकार आयसीयू कक्षाकरिता परिचारिकांची पदे आस्थापना सुचिवर निर्माण करावीत. रुग्णालयात एकूण 1648 परिचरिकांची पदे आवश्यक असल्याने आस्थापना सुचिवर निर्माण करून ही पदे त्वरित भरण्याची गरज आहे. ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यास टाळाटाळ केल्यास 1 मे पासून नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी संपावर जातील, असा इशारा रमाकांत बने यांनी दिला आहे.
Nair Hospital Nurse Strike : नायर रुग्णालयातील परिचारिका 1 मे पासून संपावर! - 1 मे पासून नायर रुग्णालयातील नर्सचा संप
रुग्णसंख्या, निर्माण केलेले नवीन वॉर्ड, उपलब्ध केलेल्या सोयी या प्रमाणात परिचारिकांची 1648 पदे भरण्याची आवश्यकता आहे. ही पदे आस्थापना सूचीवर निर्माण करून त्वरित भरावीत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.