ETV Bharat / city

Narayan Rane Bungalow : नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तपासणीला पोहोचले पालिकेचे पथक, अन्.. - महापालिकेचे पथक राणेंच्या घरी

मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेला ( Narayan Rane Bungalow Illegal Construction Complaint ) मिळाली होती. त्यानुसार पालिकेचे पथक राणे यांच्या निवासस्थानी पोहचले ( Municipal team at Rane's house ) होते. मात्र, राणे हे घरी नसल्याने पालिकेचे पथक माघारी परतले आहे.

नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तपासणीला पोहोचले पालिकेचे पथक, अन्..

author img

By

Published : Feb 18, 2022, 7:00 PM IST

मुंबई : मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली ( BMC Notice to Narayan Rane ) आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे का ( Narayan Rane Bungalow Illegal Construction Complaint ) याची पालिका तपासणी करणार ( BMC Investigate Narayan Rane Banglow Construction ) आहे. त्यासाठी पालिकेच्या के वेस्ट विभागाने बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मेजरमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले होते. यापार्श्वभूमीवर पालिकेचे पथक आज राणे यांच्या बंगल्यावर गेले ( Municipal team at Rane's house ) होते. मात्र राणे यावेळी घरी नसल्याने पालिकेचे पथक माघारी परतले आहे. पालिकेचे पथक पुन्हा सोमवारी भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तपासणीला पोहोचले पालिकेचे पथक, अन्..

काय म्हटले आहे नोटिशीत

मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या पदसिद्ध अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली एक नोटीस गुरुवारी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जारी करण्यात आली. ज्यात कळविण्यात आले की, के -पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक 18/02/22 रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी कर्मचार्‍यांसह आवारात किंवा CTS क्रमांक 997 आणि 997-A मध्ये प्रवेश करीन. त्यावेळी मोजमाप व छायाचित्रे घेण्यासाठी उक्त परिसराची पाहणी करेल. त्यावेळी बंगल्याचे बांधकामावेळचे मंजूर करण्यात आलेले प्लान, बंगल्याच्या बांधकामाबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्यात यावीत अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार आज सायंकाळी ५.१० वाजता पालिकेच्या के पश्चिम विभागातील अधिकारी राणे यांच्या बंगल्यावर पोहचले. मात्र, राणे कुटूंबीय घरात नसल्याने पालिकेचे पथक परत फिरले आहे. आज घरी कोणी नसल्याने पालिकेचे पथक पुन्हा बंगल्याला भेट देऊन मोजमाप व छायाचित्रे घेणार आहेत. त्यानंतर कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.

..तर बांधकाम तोडले जाऊ शकते

पालिकेने दिलेल्या नोटीसीनुसार पथक जाऊन बंगल्याची आणि परिसराची पाहणी करेल. प्रत्येक बांधकामाचे मोजमाप घेतले जाईल. ज्यासाठी बांधकामाची मंजुरी दिली आहे का तेच बांधकाम केले आहे का हे सुद्धा तपासले जाईल. बंगला उभारताना दिलेल्या मंजुरीनुसार बांधकाम केले नसल्यास किंवा त्यात काही बदल केले असल्यास ते बांधकाम पालिकेकडून तोडले जाऊ शकते. अशीच कारवाई याआधी सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरावरही झाली होती.

आरोप- प्रत्यारोप

याआधी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर स्थानिक प्रशासन आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याचा आरोप केला होता. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. शिवसेनेवर सूड उगवत स्थानिक प्रशासनाचा वापर करून दबाव निर्माण केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.