मुंबई - शिवसेनेच्या स्थापनेपासून गेले ५६ वर्षे दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दसरा मेळावा होत आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे व नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना याच ठिकाणहून मार्गदर्शन केले आहे. सध्या शिवसेनेत मोठी फूट पडली असून शिवसेना नक्की कोणाची याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेला आहे. Kishori Pednekar reaction on Dussehra gathering यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा साजरा करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्यात आलेला आहे. या अर्जावर पालिकेने कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी बोलताना, दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप पालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ते नक्की याच्यावर विचार करतील यावर बोलताना पालिकेने भूमिका स्पष्ट करावी लागेल. दरवर्षी ५ ते ६ कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. ५६ वर्षाचा हा रेकॉर्ड आहे. त्यात कोणीही असे तसे घुसू शकत नाही. शिवसेना कोणाची हा कोर्टात विषय आहे, त्याचा पालिकेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे दबावाखाली आहोत असे दाखवून पालिकेने कामे करू नयेत. दरवर्षी ज्या प्रमाणे परवानगी दिली जाते त्याप्रमाणे परवानगीची दिली पाहिजे. परवानगी दिली नाही असे दिसते आहे. सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे हे सक्षम अधिकारी आहेत. ते नक्की याच्यावर विचार करतील. पालिका आयुक्तांनी यावर लवकर पडदा पाडावा अशी विनंतीही पेडणेकर यांनी केली आहे.
शिवसेनेची गळचेपी करू शकत नाही दसरा मेळावा होणारच. तुमचा घरोबा नैसर्गिक की अनैसर्गिक हे लवकरच कळेल. अचानक दिल्लीहून आलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे सर्व चालले आहे. पण जे काही चालले आहे ते सर्व वाईट चालले आहे. रडीचा डाव मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. लोकांमध्ये प्रक्षोभ आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिवसेना पक्षाची गळचेपी करू शकत नाही. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी गेलात तर नक्कीच तुमचा फायदा होऊ देत. अशी आम्ही प्रार्थना करू. ज्या घरामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात त्या घराचा असा अंत करू नका असही फडणवीस म्हणाल्या आहेत.
दळभद्री काम करू नका दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी माझे पत्र जाते. यंदा माझे पत्र गेले नाही म्हणून पालिका अधिकारी संभ्रमित झाले असतील असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे. यावर बोलताना, आमदार सदा सरवणकर यांची गळचेपी केली त्या सहाय्यक आयुक्त यांची बदली करण्यात आली आहे. किमान केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून याबाबतीत तरी त्यांनी आड काठी घेऊ नये. असे दळभद्री काम करू नका असही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - Ghulam Nabi Azad गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, पाहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण