ETV Bharat / city

ईटीव्ही विशेष : अच्छे दिन कधी येणार? मुंबईचे डबेवाले आर्थिक संकटात

author img

By

Published : Aug 27, 2020, 11:11 AM IST

लॉकडाऊनमुळे या डबेवाल्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी आणि पनवेल अशा तिन्ही मार्गावर डबे पोहोचवणारे हे डबेवाले, मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवेवर बहुतांश अवलंबून आहेत. परंतु, लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचा व्यवसाय अजूनही बंद आहे. बहुतांश डबेवाले मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याकडे घरभाडे भरायलाही पैसे नसल्याने गावी गेले आहेत.

mumbais-dabewala-facing-financial-problem
अच्छे दिन कधी येणार? मुंबईचे डबेवाले आर्थिक संकटात

मुंबई - राजधानी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका या डबेवाल्यांनाही बसला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतरही ठप्प आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आमचे अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न मुंबईतील डबेवाल्यांना पडला आहे.

मुंबईचे ५ हजार डबेवाले दररोज ६ लाख चाकरमान्यांना डबा पोहोचवण्याचे काम करतात. मुंबईतील हे डबेवाले म्हणजे एक प्रकारचे मॅनेजमेंट गुरूच आहेत. त्यांची मॅनेजमेंट पाहून पार ब्रिटनचे राजकुमारही दंग झाले होते. मात्र, आज लॉकडाऊनमुळे या डबेवाल्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी आणि पनवेल अशा तिन्ही मार्गावर डबे पोहोचवणारे हे डबेवाले, मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवेवर बहुतांश अवलंबून आहेत. परंतु, लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचा व्यवसाय अजूनही बंद आहे. बहुतांश डबेवाले मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याकडे घरभाडे भरायलाही पैसे नसल्याने गावी गेले आहेत.

मुंबईतील ९० टक्के डबेवाले कामगार मुळचे पुणे जिल्ह्यातील मावळ, जुन्नर, मुळाशी, खेड, राजगुरु नगर भागातील आहेत, तर दहा टक्के नगर जिल्ह्यातील संगमनेरमधील आहेत. मुंबईत रेशनकार्ड नाही म्हणून येथे रेशन मिळत नाही. त्यामुळे डबेवाल्यांनी करायचे काय, असा सवाल डबेवाल्यांसमोर उभा होता. परंतु आता या डबेवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी नूतन मुंबई डबेवाला ट्रस्ट या संस्थेने एका मदत फंडाची निर्मिती केली आहे. डबेवाल्यांना आता आमदार रोहित पवारांची साथ लाभली आहे.

आमदार रोहित पवारांनी मुंबईतल्या डबेवाल्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. डबेवालाच्या मदतीसाठी आमदार रोहित पवार यांनी आव्हान केले असून या कार्यात ते डबेवाल्यांची सर्वतोपरी मदत करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.