मुंबई- काल (गुरुवारी) रात्रीपासून शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस जोर आणखी वाढेल, असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तविला आहे.
सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी होईल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे. आज (शुक्रवारी) सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तसेच जोरदार वारे वाहत आहेत. शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबईकरांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.