ETV Bharat / city

यावर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही; महापालिकेने लढवली ही शक्कल

author img

By

Published : Jun 7, 2021, 9:59 AM IST

मुसळधार पावसामुळे पाणी तुंबु नये यासाठी, मुंबई महानगरपालिकेने हिंदमाता जंक्शनवर तसेच परेल परिसरातील झेवियर्स मैदानात भूमिगत पावसाच्या पाण्याच्या साठवण टाक्या तयार करत आहे. या टाक्यांमुळे काही तास मुसळधार पाऊस व पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल.

मुंबईची तुंबई
मुंबईची तुंबई

मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग पाण्याखाली येतो. पावसाळ्यात दरवर्षी हिंदमाता, दादर टीटी आणि परळ या परिसरातील सखल भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. परंतु यावर्षी पावसाळ्यात या भागात पाणी साचणार नाही, असा दावा बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे.

मार्चमध्ये दोन टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते

मुंबईच्या हिंदमाता येथे अंडरग्राऊंड पावसाच्या पाण्याची साठवण टाक्या बांधण्याचा प्रकल्प हा पायलट प्रकल्प म्हणून बांधल्या जात आहे. तसेच पावसाळ्याच्या पूर-प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी इतर भागातही केली जाईल, अशी माहिती मनपाने दिली. यावर्षी मार्चमध्ये दोन टाक्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. जूनपर्यंत या तयार होतील अशी अपेक्षा आहे.

यावर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही

सुमारे 30 लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता

या योजनेनुसार दादरच्या प्रमोद महाजन कला उद्यानात आणि परळ येथील सेंट झेविअरच्या मैदानावर कॉंक्रिटद्वारे बनविलेले दोन भूमिगत पावसाच्या पाण्याची साठवण टाक्या तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक टाकी सुमारे 100 मीटर लांबीची, 50 मीटर रुंदीची आणि सहा मीटर खोल असेल तर सुमारे 30 लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता असेल. या प्रकल्पासाठी सुमारे 130 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने उचललेले हे पाऊल अतिशय उल्लेखनीय आहे. मुंबईतील हिंदमाता दादर किंग सर्कल भागात पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे त्यावर काही नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - वांद्र्यातील इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.