मुंबई - मुंबईत पावसाला सुरुवात होताच दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. चेंबूर आणि साकीनाका येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असताना मंगळवारी (दि. 21 जून) घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे कंपाऊंडची भिंत कोसळल्याने तीन जण जखमी झाले. त्यापैकी एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. आजही मुंबईत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तीन जणांना बाहेर काढले - घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे वन विभागाच्या जागेवर जय अंबे नगर झोपडपट्टी आहे. येथील एका घरावर काल ( मंगळवारी) दुपारी पाउणे दोन वाजण्याच्या सुमारास कंपाऊंडती भिंत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. या तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
लहान मुलीचा मृत्यू - तिघा जखमींपैकी नायरा धोत्रे या 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शांताबाई धोत्रे ( वय 50 वर्षे) यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश पवार (वय 33 वर्षे) हे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रात्री उशिरा रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आली आहे.
हेही वाचा - Anil Parab ED Inquiry : शिवसेना दुहेरी संकटात; ई़डीकडून 10 तासांच्या चौकशीनंतर अनिल परबांच्या अटकेची शक्यता