मुंबई - मुंबईकरांचा आणि नागपूरकरांचा भविष्यातील रेल्वे प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई ते नागपूर या 736 किलोमीटरचा हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाची सुरुवात झालेली आहे. हा प्रकल्प मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या शेजारी असणार असून समृद्धी महामार्गासाठी अधिकृत केलेली जागा बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला देणार होते. मात्र, आता पूर्ण जागा देण्यास नकार देत फक्त 20 ते 30 टक्के समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाती जागा देणार असल्यासाची माहिती मिळत आहे. त्यामुळे हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची भविष्यात अडचण वाढणार आहे.
- भविष्यात अडचण वाढणार-
राज्यातील महत्वाच्या बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासोबतच प्रस्तावित असलेल्या 736 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला मजुरी मिळाली आहे. तसेच बुलेट ट्रेन मार्गाचे सर्वेक्षण 12 मार्चपासून सुरू झाले आहे. बुलेट ट्रेन हा समृद्धी महामार्गाच्या शेजारी असणार आहे. अशा प्रकारचा महामार्ग देशातील पहिलाचं असणार आहे. समृद्धी महामार्गाशेजारी बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्यासाठी एका पथकाने पाहणी केली होती. तसेच रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा याकरिता देण्यात येणार होते. मात्र, आता रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा फक्त २० ते ३० टक्के देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबई - नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्पाची भविष्यात अडचण वाढणार आहे.
- एमएसआरडीसी फक्त ३० टक्के जागा देणार -
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची आणि महाराष्ट्र रस्ते महामंडळाची गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली आहे. या बैठकीत समृद्धी महामार्गाशेजारी बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा प्रकल्पावर चर्चा झालेली आहे. या चर्चेत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या जमिनीपैकी बुलेट ट्रेनचा प्रकल्पासाठी फक्त २० ते ३० टक्के जागा देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रेल्वेला बुलेट ट्रेनसाठी आणखी जागा खरेदी करावी लागणार आहे. महाराष्ट्र रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने अतिरिक्त भूसंपादन केले आहे. भविष्यात महामार्गाचे विस्तारीकरणासाठी आणि इतर कारणासाठी यांच्या उपयोग होणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी फक्त २० ते ३० टक्के अधिग्रहीत केलेली जागा देता येईल.
- डिसेंबर महिन्यापर्यंत होणार सर्वेक्षण-
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मुंबई-नागपूर - बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्व्हे) सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी अत्याधुनिक 'एरियल लिडार' आणि इमेजरी सेन्सरने बसवलेल्या विमानाने ग्राउंड सर्वेक्षणचं काम सुरू आहे. हे सर्वेक्षण डिसेंबर 2021 रोजीपर्यत पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून फक्त 20 ते 30 टक्के जागा उपलब्ध करून देणार असल्याने उर्वरित जागेसाठी एनएचएसआरसीएलकडून सखोल चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सर्व बाबीचा विचार करण्यात येत आहे. प्रस्तावित महामार्गातील पिके, फळ बागे आणि तलावाचा नोंदी सुद्धा या सर्वेक्षणात घेण्यात येत आहे.
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन -
लांबी : ७३६ किमी
- मार्गातील शहरे :
शहापूर, इगतपुरी, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मालेगाव, करंजाड, पुलगाव, वर्धा, खापरी डेपो आणि नागपूर
हेही वाचा - पाचाड गावात 6 जूनपर्यंत कडक जनता कर्फ्यू; शिवराज्याभिषेकासाठी गर्दी करू नये ग्रामपंचायतीचे आवाहन
हेही वाचा - पीक विम्याचे अपयश लपवण्यासाठी सरकार लोकांची दिशाभूल करते - देवेंद्र फडणवीस