ETV Bharat / city

Mumbai Serial Bomb Blast : लोकलमधील साखळी बॉम्बस्फोटामुळे हादरली होती मुंबई; आज 'त्या' घटनेला 16 वर्ष पूर्ण - मुंबई साखळी बॉम्बस्फोट मराठी बातमी

मुंबईची लोकल म्हणजे नागरिकांची लाईफलाईन. मात्र, याच लाईफलाईनमध्ये 16 वर्षांपूर्वी मोठा बॉम्बस्फोट झाला ( Bomb Blast Local Trains 16 Year Complete ) होता. त्यामध्ये 200 पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला ( Mumbai Serial Bomb Blast ) होता.

Mumbai Serial Bomb Blast
Mumbai Serial Bomb Blast
author img

By

Published : Jul 11, 2022, 3:44 PM IST

मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजे लोकल. लोकल रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. त्यात सकाळी आणि संध्याकाळच्या सुमाराला तर खूप गर्दी असते. 16 वर्षांपूर्वी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही लाईफलाईन अशीच धावत होती. त्यावेळी अचानक एका पाठोपाठ एक असे सात बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईची लाईफलाईन हादरुन ( Bomb Blast Local Trains 16 Year Complete ) गेली. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या 7 स्थानकांवर झालेल्या या बॉम्बस्फोटाने मुंबईसह देशभरात एकच खळबळ उडाली. या बॉम्बस्फोटात दोनशेहून अधिक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला तर सातशेहून अधिक लोक जखमी ( Mumbai Serial Bomb Blast ) झाले.

209 जणांचा मृत्यू - 11 जुलै 2006 रोजी पश्चिम रेल्वेवर पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट झाल्याने मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खाररोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा, बोरीवली आणि वांद्रे या सात स्थानकामध्ये हे स्फोट झाले. यावेळी 209 जणांना जीव गमवावा लागला होता. तर, 714 जण जखमी झाले. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर पुन्हा एकदा मुंबई हादरली होती.

714 जण जखमी - 2006 मध्ये पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. पुढे एका पाठोपाठ एक असे एकूण 7 बॉम्बस्फोट झाले आणि मुंबई हादरली. पश्चिम रेल्वेच्या खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले. त्यात 209 निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आणि 714 जण जखमी झाले. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर पुन्हा एकदा साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. याच बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये आजही या कटू आठवणीच्या जखमा ताज्या आहेत.

13 आरोपींमधून 12 जण दोषी - याप्रकरणी 2015 रोजी न्यायालयाने 13 आरोपींमधून 12 जणांना दोषी ठरवले होते. यातील कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दिकी, नावेद हुसेन खान,असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर, तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बॉम्बस्फोटाचा योजनाबद्ध कट - या बॉम्बस्फोटासाठी सिमी आणि लष्कर या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरीत्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणले. घटनेनंतर एटीएसनं 13 जणांना अटक केली. एटीएसकडून अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 11 सप्टेंबर 2015 रोजी खास न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर, सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.

न्यायालयीन प्रक्रिया - 11 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याची न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण झाली. सुनावणीदरम्यान फेब्रुवारी 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवर स्थगिती आणली. कमाल अंसारी या आरोपीने मकोका कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान 400 जणांना अटक - सुनावणीदरम्यान तब्बल 192 साक्षीदार न्यायालयासमोर आले. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी, 8 डॉक्टर आणि 5 प्रशासकीय सेवेशी निगडीत अधिकाऱ्यांचा समावेश होता. या घटनेच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या. तसेच, यामध्ये रॉ बरोबरच आयबीचीही मदत मागितली होती. तपासादरम्यान एकूण 400 जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अखेरीस 13 आरोपीमधून 12 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर देशभरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. या घटनेला आज 16 वर्षे होत असली, तरी याच्या जखमा ताज्याच आहेत.

हेही वाचा - Fire By CRPF Constable : जोधपूरमध्ये सीआरपीएफ जवानाचा हवेत गोळीबार, कुटुंबाला ठेवले ओलिस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.