ETV Bharat / city

Mumbai Schools Reopen - ओमायक्रॉनची भीती.. मुंबईत मुलांना शाळेत पाठवण्यास ३४ टक्के पालकांचीच परवानगी - Raju Tadvi education officer mumbai

आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या ( Mumbai Schools Reopen ) तरी ३४ टक्के पालकांनीच आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी संमती दिली आहे. यावरून कोरोना आणि ओमायक्रॉनच्या ( Omicron Cases Mumbai ) भीतीने आजही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.

Mumbai Schools parents permission
मुंबई शाळा 34 टक्के पालक परवानगी
author img

By

Published : Dec 15, 2021, 3:48 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रसार आणि त्यातच ओमायक्रॉन ( Omicron Cases Mumbai ) या विषाणूच्या व्हेरिएंटचे रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत आजपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यास सरकार आणि मुंबई महाललिकेने परवानगी दिली आहे ( Mumbai Schools Reopen ). त्यानुसार आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी ३४ टक्के पालकांनीच आपल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी संमती दिली आहे. यावरून कोरोना आणि ओमायक्रॉनच्या भीतीने आजही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Maharashtra leaders on OBC Reservation Update : ओबीसी आरक्षणासंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रीया

३४ टक्के पालकांची संमती -

राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यातील शाळा ( Maharashtra schools reopening ) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आजपासून १ ली ते ७ वी च्या शाळा ( Maharashtra schools classes 1 to 7 ) सुरू करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीत १ ली ते ७ वीच्या २ हजार ३४ शाळा येतात. त्यापैकी आज १ हजार ९२ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. १ ली ते ७ वी पर्यंत ५ लाख ९१ हजार ८८२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३४ टक्के म्हणजेच, २ लाख ६३९ विद्यार्थ्यांच्या पालकांनीच आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास परवानगी दिली आहे.

१ ली ते ७ वीच्या शाळांमधील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २१ हजार ३१० असून त्यापैकी २० हजार २१२ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. शाळांच्या इमारतींचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांसाठी मास्क, थर्मल गन, प्लस ऑक्सिमीटर, इमारत निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईडचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

पालकांचे संमती पत्र घ्यावे लागणार -

१५ डिसेंबरपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांची शाळा सुरू करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. या वर्गातील विद्यार्थी लहान वयाचे असल्याने त्यांच्या पालकांनी परवानगी दिली तरच त्यांना शाळेत ऑलाईन पद्धतीने शिकवले जाईल. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे नसेल त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल. या कालावधीत सर्व शाळांच्या इमारती सॅनिटाईज करून स्वच्छ केल्या जातील, असे तडवी यांनी सांगितले.

असे असतील नियम -

- शाळा सुरू केल्यावर एका बेंचवर एक विद्यार्थी असेल.
- शाळेत २ ते ३ तास विद्यार्थी येतील.
- दोन सत्राच्या मधल्या वेळात शाळा सॅनिटाईज केल्या जातील.
- विद्यार्थ्यांना शाळेत मास्क घालावे लागेल.
- सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार.
- जे विद्यार्थी शाळेत येतील त्यांना ऑफलाईन शिक्षण, तर जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार.

पालकांमध्ये भीती -

मुंबईत आजपासून शाळा सुरू झाल्या असल्या ( Mumbai Schools Reopen ) तरी कोरोना विषाणू आणि ओमायक्रॉन हा नवा विषाणू याचे रुग्ण आढळून येत असल्याने पालकांमध्ये भीती आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने त्यांना कोरोना किंवा ओमायक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो. या भीतीने पालकांकडून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयारी दाखवली जात नाही.

हेही वाचा - Sachin Waze Demands Meat : अंडी आणि मांसाहाराचे जेवण द्या, सचिन वाझेंची एनआयएच्या विशेष कोर्टात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.