मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता सर्व शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच राहतील असे परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहे.
मार्च २०२०पासून शाळा बंदच -
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला. मार्च पासून सर्व व्यवहार बंद झाले. शाळाही बंद झाल्या. इतकेच नव्हे तर दहावीचा एक पेपरही रद्द करण्यात आला. पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केला होता.