ETV Bharat / city

Aarey Forest Protest : आरे मेट्रो-3 कारशेड विरोधात वणवा पेटला, शेकडो तरुण पर्यावरण प्रेमी रस्त्यावर

author img

By

Published : Jul 3, 2022, 10:38 PM IST

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आरेमध्ये मेट्रो कारशेड होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याविरोधात आज ( 3 जुलै ) येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एक येत या निर्णयाला विरोध केला ( Aarey Forest Protest ) आहे.

Aarey Forest Protest
Aarey Forest Protest

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासात लगेचच आरे मधील मेट्रो-3 च्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचे आदेश दिले. यामुळे पुन्हा एकदा आरे जंगलात वादाचा वाणवा पेटला आहे. नवीन सरकारच्या या निर्णयाविरोधात आज ( 3 जुलै ) आरे येथील पिकनिक पॉईंट जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संघटना व राजकीय पक्षांनी एक येत या निर्णयाला विरोध केला ( Aarey Forest Protest ) आहे.

"मी त्या 29 जणांपैकी एक" - यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणाले की, "आम्ही इथं एखाद्या पक्षाला विरोध करण्यासाठी आलेलो नाही. आपण सर्वांनीच पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. इथं जी काही लोक आलेत, ती कोणत्याही पक्षाला विरोध करण्यासाठी नाही. तर, आरेच जंगल वाचवण्यासाठी आलेले आहेत. मागच्या वेळी ज्या 29 जणांना अटक करण्यात आली होती. मी देखील त्यातलाच एक आहे. माझ्यावर प्रचंड प्रेशर आहे. मला सगळी लोक सांगतात की या आंदोलनात सहभागी होऊ नको. तरीसुद्धा मी इथं आलोय. कारण, विषय पर्यावरणाचा आहे. आणि इथे राहणाऱ्या आदिवासींच्या प्रश्नांचा आहे."

आरे मुंबईचं फुफ्फुस - आरेच्या या 1,800 एकर वनक्षेत्राची 'मुंबईचे फुफ्फुस' म्हणून ओळख आहे. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषण मुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत. तर वन्यजीवांसाठी एक प्रमुख अधिवास देखील आहेत. त्यापैकी काही स्थानिक आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.

पर्यावरणवादी नागरिकांशी संवाद साधताना प्रतिनिधी

"...तर पहिली वीट मी लावेन" - पुढे बोलताना इथले पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणाले की, "आमच्या विरोधात एक अफवा देखील पसरवली जात आहे की, आम्ही पूर्ण मेट्रो प्रकल्पाचे विरोधात आहोत. ही अतिशय चुकीची माहिती आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. पण, हा विकास जर झाड तोडून, पर्यावरणाचा ऱ्हास करून होणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. याच मेट्रो कारशेडला कांजूरमार्गचा देखील पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही कारशेड आरे मधून कांजूरमार्गाला न्या तिथं कारशेडसाठी पहिली वीट मी माझ्या हाताने लावेल. पण, तुम्ही जर आरे मध्येच कारशेड बांधणार असाल तर त्याला आमचा विरोध हा कायम असेल."

2014 पासून आरे वादात - आरेमध्ये मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र, कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्यास कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारशेडसाठी कांजूरमार्ग निवडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांजूरमार्ग ऐवजी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले.

"आम्ही पण बघतो कसं काम करतात" - आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा म्हणाल्या की, "साधारण 2014 पासून आम्ही आरेच जंगल वाचवण्यासाठी ही लढाई देतोय. अरे हे फक्त जंगल नाही तर ते मुंबईचे जीवन आहे. जर हे जंगलच नसेल तर मुंबई पाण्याखाली दिसेल. देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी सांगून झालं, आरे येथील मेट्रो कारशेड इतर ठिकाणी घ्या. पण, ते आपल्या हट्टावर अडकून आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. जर अरे गेलं तर मुंबईची लोक मरतील आणि हे आम्ही होऊ देणार नाही. पाच वर्षे होती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारशेड बनवायला. ते करू शकले का ? आता या पुढच्या अडीच वर्षात देखील आम्ही बघतो ते इथे कारशेड कशी बनवतात ?"

दरम्यान, 2019 मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रो कारशेडला स्थगिती आणत आरे येतील जंगलाला संरक्षित वनाचा दर्जा दिला. मेट्रो तीनच्या कामासाठी कांजूर मार्ग पूर्व उपनगरात मेट्रो-3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा निर्णय कायदेशीर वादात अडकला. आता या सर्वांवर शिंदे फडणवीस सरकार नेमकं काय निर्णय घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा - Amit Thackeray Appeal : 'मेट्रो कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा'; नवीन सरकारच्या निर्णयाविरोधात अमित ठाकरे मैदानात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.