मुंबई - मुंबईत गेले काही दिवस पाऊस पडत (Mumbai Rain Update) आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. दिवसभरात साधारण ते मध्यम पाऊस पडेल, अशी शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली (possibility of moderate rain in Mumbai) आहे. दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक सुरळीत - शनिवार १७ ते आज रविवार १८ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात २९.८२, पूर्व उपनगरात ५१.२८ तर पश्चिम उपनगरात ६४.१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत १७ ते २० सप्टेंबर दरम्यान पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान मुंबईत साधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Cloudy weather possibility of moderate rain) पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. (Mumbai Rain Update today)