मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना शोधण्याकरता मुंबई पोलिसांकडून 7 पथक तयार करण्यात आले असून या पथकाद्वारे संदीप देशपांडे यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढण्याकरता दिलेल्या अल्टीमीटर नंतर 4 मे रोजी कायदा व सुव्यवस्थेकरिता राज्यातील अनेक मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
संदीप देशपांडेंच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई बाहेरही या दोघांचा शोध - संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या 4 टीम केल्या तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुंबई क्राईम ब्रॅंचच्या 3 टीम देखील मनसेच्या या दोन्ही नेत्यांचा शोध घेत आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली या ठिकाणी शोध घेत आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरही या दोघांचा शोध असल्याची माहिती मिळत आहे.
संदीप देशपांडे यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून 7 पथक रवाना - मुंबई मनसे संदीप देशपांडे बातमी
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या 4 टीम केल्या तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुंबई क्राईम ब्रॅंचच्या 3 टीम देखील मनसेच्या या दोन्ही नेत्यांचा शोध घेत आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोध घेण्यासाठी पोलीस, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली या ठिकाणी शोध घेत आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरही या दोघांचा शोध असल्याची माहिती मिळत आहे.