मुंबई - मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) गुन्हेशाखा गुप्तवार्ता विभागाने Crime Intelligence Unit ( CIU ) पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा ( Counterfeit Note Factory Case ) पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत.
पायधुनी ठाण्यात गुन्हा दाखल -
पायधुनीच्या करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथेआरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता. मागील अनेक दिवसापासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली असून त्याचा साथीदार याचा शोध पोलीस घेत आहेत. शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकास अटक केली आहे.
हेही वाचा - Heroin Seize At Mumbai Airport : मुंबई विमानतळावर दोन विदेशी महिलांकडून ३ किलो ९१० ग्रॅम हेरॉईन जप्त