ETV Bharat / city

Adulteration of Tea Powder - मुंबई पोलिसांकडून चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक - मुंबई चहा पावडर भेसळ बातमी

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे. पोलिसांनी या कारवाईत 430 किलोची भेसळयुक्त चहा पावडर शिवडीच्या बंदररोड परिसरातून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ पसरली आहे. सध्या बाजारात या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत 85 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू अबुलजहर शेख, राहुल शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

mumbai police arrests gang involved in counterfeiting of tea powder
मुंबई पोलिसांकडून चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक
author img

By

Published : May 16, 2022, 3:05 PM IST

Updated : May 16, 2022, 3:40 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर मुंबईतील शिवडी बंदर रस्त्यावर पोलिसांनी छापेमारी जप्त केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दोन आरोपींना आज अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

चक्क चहा पावडरमध्येही भेसळ - आतापर्यंत दुधात भेसळ, पनीरमध्ये भसेळ, खव्यात भेसळ अशा बातम्या ऐकल्या आहेत. पण आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील शिवडी बंदर रोडवर छापेमारी केली.

या प्रकरणी दोघांना अटक - पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेसळयुक्त चहा पावडर पकडली आहे. पोलिसांनी या कारवाईत 430 किलोची भेसळयुक्त चहा पावडर शिवडीच्या बंदररोड परिसरातून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ पसरली आहे. सध्या बाजारात या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत 85 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू अबुलजहर शेख, राहुल शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून या प्रकरणासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Last Updated : May 16, 2022, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.