ETV Bharat / city

भुलेश्वर येथील ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या 10 आरोपींना अटक; 8 कोटी रुपये जप्त

मुंबई एलटीटी पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावण्यातकरीता सहा टीम तयार करण्यात आले. सीसीटीवी फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी दुकानांमध्ये काम करत असलेल्या मुख्य आरोपी गणेश देवासी याच्या मोबाइल ट्रॅक करत त्याला मध्यप्रदेशमधील माधवपुर येथून अटक केली.

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : Jan 28, 2022, 4:59 PM IST

Updated : Jan 28, 2022, 5:17 PM IST

मुंबई - भुलेश्वर येथील जेनीश ज्वेलर्समध्ये 14 जानेवारी रोजी मध्यरात्री दुकानातून 17 किलो सोन्यासह 8 लाख 57 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. ज्वेलर्स मालक खुशाल टामका यांच्या तक्रारीवरुन एलटीडी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 8 कोटी 19 लाख 67 हजार रुपयांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. यामध्ये दुकानात काम करत असलेला मुख्य आरोपी गणेश देवासी याला अटक केली. मुंबई पोलिसांनी तपासाकरिता वेगवेगळ्या सहा टीम तयार करत गुन्हेगारांचा छडा लावला आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमधून आतापर्यंत या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिली आहे.

माहिती देतांना सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

अशी करण्यात आली अटक

मुंबई एलटीटी पोलिसांकडून या प्रकरणाचा छडा लावण्यातकरीता सहा टीम तयार करण्यात आले. सीसीटीवी फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी दुकानांमध्ये काम करत असलेल्या मुख्य आरोपी गणेश देवासी याच्या मोबाइल ट्रॅक करत त्याला मध्यप्रदेशमधील माधवपुर येथून अटक केली. या तपासात मुंबई पोलिसांना असे लक्षात आले की चोरी करण्याचा त्यांचा उद्देश हा आधीच ठरलेला होता. त्यानुसार या दुकानातून मुख्य सूत्रधार गणेश देवासी याने त्याच्या साथीदारांसोबत चोरी केली, हे तपासात समोर आले आहे. चोरी केल्यानंतर आरोपी बोरिवली येथे ओला कॅप करत गेल्यानंतर बोरिवलीवरून त्यांनी खासगी वाहनाद्वारे प्रवास केला. मध्यंतरी एका ठिकाणी सर्व आरोपींनी चोरीचा लुटलेला मालाची वाटणी केली. मुख्य आरोपी असलेला देवासीनेच 50% चोरी केलेला माल आपल्याकडे ठेवला. तर उर्वरित 50 टक्के रक्कम ही इतर लोकांमध्ये वाटण्यात आले. देवासीकडून चोरी केलेला संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत आठ लोकांना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात इतर आरोपी कैलासकुमार मंगलाराम तुरी भाट (22), किसन प्रल्हाद चौहाण (21) या दोन्ही आरोपींना मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. राजस्थान येथील पोलीस पथकानेवर या गुन्ह्यातील आरोपींना आश्रय देणारे व त्यांचेकडून चोरीची मालमत्ता स्विकारणारे आरोपी श्यामलाल मोहनला सोनी (58), विक्रमकुमार सोगाराम मेघवाल वास (22), उत्तम पन्नाराम घांची (28) यांना राजस्थानमधून अटक करून त्यांच्याकडून एकूण 1054.74 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 48,65,330 व रोख रक्कम रुपये 75000 मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

हेही वाचा - Financial Fraud Pune : तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Last Updated : Jan 28, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.