मुंबई : मुंबईतील ओशिवरा परिसरातील एका व्यवसायिकाला 35 लाखांची खंडणी मागणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या हस्तकाला ओशिवारा पोलिसांनी ( Oshiwara police ) मंगळवारी अटक केली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ओशिवरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेकरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला 12 आणि 13 जुलै रोजी फोनवरून 35 लाखांची खंडणी ( Extortion of 35 Lakhs ) मागण्यात आली होती. जर खंडणी देण्यात आली नाही, तर जीवे मारण्याची धमकीदेखील अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या हस्तगत ( Underworld Dan Chhota Shakeel ) असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक : तक्रारदाराने यासंदर्भातील माहिती ओशिवरा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर 24 वर्षीय बिल्लो नामक आरोपी अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने मंगळवारी उपनगरी ओशिवरा येथून 25 वर्षीय आरोपीला अटक केली. ज्याने स्वत:ला बिल्लो म्हणून ओळखले होते. शहरातील बेकरी-शॉपची व्यावसायिकाला आरोपींनी अनेक वेळा फोन करून शकीलचा साथीदार असल्याचे सांगून 35 लाख रुपयांची मागणी केली.
आरोपीने व्यावसायिकाला दिली होती धमकी : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा हस्तक असल्याचे सांगून आरोपीला वारंवार धमकाविण्यात येत होते. आरोपीने व्यावसायिकाला धमकीदेखील दिली होती. जर व्यावसायिकाने मंगळवारपर्यंत पैसे दिले नाहीत, तर त्याला गोळ्या घालू, असे आरोपीने त्याला सांगितले. व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून बिल्लोला अटक केली.
हेही वाचा : Letter of Raj Thackeray : मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, राज ठाकरेंचे सह्याद्री वाहिनीला पत्र