मुंबई - शहराच्या पूर्व उपनगरातील स्थानिक आमदार नसीम खान यांच्या आमदार निधीतून पवई तलाव येथे 'माय इंडिया' या नावाने सेल्फी बनवण्यात आला आहे. पवई तलाव भागात मोठ्या संख्येने पर्यटक व नागरिक येत असतात. या भागात नागरिकांकडून फोटो घेण्याची हौस असते, यासाठीच इथे आता अधिकृत असा सेल्फी पॉईंट निर्माण करण्यात आला आहे.
सेल्फी घेणे हा प्रकार आता सर्वत्र पसरला असल्याने सेल्फीसाठी काही धोकादायक जागी उभे राहून व धोकादायक स्टंट करून आपला जीव गमवावे लागल्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झालेले दिसतात. यामुळे जागोजागी पर्यटन स्थळी सेल्फी निर्माण केल्याने पर्यटनात देखील भर होते व संभाव्य होणारा धोका काही प्रमाणात टाळता येतो.
हेही वाचा... पवईत विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन
पवई तलाव हा मुंबई पूर्व उपनगरातील आकाराने मोठा व प्रसिद्ध तलाव आहे. या तलावावर मोठ्या प्रमाणात युवक-युवती फिरण्यासाठी येत असतात., तर नागरिक व पर्यटक या तलावावर येऊन निसर्गसंपन्न अशा वातावरणात काही वेळ घालवतात. या तलावात वर्षभर पाणी असते, येथुन जवळूनच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जातो तो पूर्व-पश्चिम उपनगराला जोडतो. परिसरात असणारी पंचतारांकित हॉटेल्स, आयआयटी परिसर यामुळे साहजिकच येथे फिरायला येणारे नागरिक व पर्यटक यांची संख्या अधिक असते.
हेही वाचा... हैदराबादच्या धर्तीवर पवई तलावात भगवान बुध्दांचा पुतळा उभारा - आमदार नसीम खान
स्थानिक आमदार नसीम खान यांनी या ठिकाणचे पर्यटन लक्षात घेऊन, आपल्या आमदार निधीतून माय इंडिया नावाच्या सेल्फी ची येथे निर्मीती केली आहे. या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन रविवारी उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा... मुंबईत संततधार कायम; पवई तलाव भरला, पर्यटकांची गर्दी
हेही वाचा... पवई तलावाची डम्पिंग कडे वाटचाल?