मुंबई - एनसीबीतर्फे गेल्या 2 दिवसात मुंबईतील 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. दरम्यान, काल रात्री उशीरा एनसीबीच्या टीमने 20 ते 22 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. हा मुलगा कोण आहे. याबाबत एनसीबीतर्फे कोणतीही माहिती देण्यात आली नसून सूत्रांनुसार, तो ड्रग पेडलर असल्याचे सांगितले जात आहे.
एमडी ड्र्ग्ज जप्त -
एनसीबीच्या वांद्रे युनिटचे पथक अंधेरीच्या चार बंगला परिसरात गस्त घालत असताना जम्बो किड्सच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना नजरेस पडला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 100 ग्रॅम एमडी मिळाले. चौकशीवेळी त्याने हा एमडी वर्सोवा येथे राहणारा अल्ताफ शेख याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शेखच्या घरावर धडक दिली. त्याच्याकडे 60 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. पोलिसांनी अब्दुल्लाह शेख आणि अल्ताफ शेख या दोघांकडून 160 ग्रॅम एमडीचा साठा हस्तगत केला आहे. क्रुज ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एनसीबीने गेल्या 2 दिवसात मुंबईतील 6 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यापैकी अनन्या पांडेच्या घराचा समावेश आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेची गुरुवारी एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. तसेच, तीला शुक्रवारी सकाळी 11वाजता एनसीबीने पुन्हा बोलावले आहे.
ड्रग्ज प्रकरण इतर बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत -
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अनन्या पांडे यांचा काय संबंध आहे, हे जाणून घेण्याचा एनसीबी प्रयत्न करत आहे. वांद्रे, नालासोपारा, सीएसटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई येथे एनसीबीचे छापे. त्याच शोधात, वांद्रे येथील आंद्रीव रोड येथे अनन्या पांडेचे घरदेखील आहे. क्रुज ड्रग्स प्रकरणात अनन्या पांडेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आर्यन खानच्या ड्रग प्रकरण आता इतर बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत पोहोचू लागले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अनन्या पांडेच्या घराची झडती घेतली आणि तिचा लॅपटॉप मोबाईल जप्त केला. ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यनच्या ड्रग्स चॅटमध्ये बातमी आली ती अनन्या पांडे असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा - अभिनेत्री अनन्या पांडेची आज पुन्हा एनसीबीकडून होणार चौकशी