ETV Bharat / city

मुंबई महापालिकेचा २,९४५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प

author img

By

Published : Feb 3, 2021, 1:31 PM IST

Updated : Feb 3, 2021, 4:03 PM IST

सन २०२०-२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न आणि खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षाकरिता म्हणजेच २०२१-२२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी इतके आहे.

मुंबई महापालिकेचा २,९४५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचा २,९४५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४५.७८ कोटींचा अर्थसंकल्प सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सादर केला. दरम्यान, सहआयुक्त रमेश पवार हे पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याने अर्थसंकल्प सादर करण्यास काही वेळ उशीर झाला.

मुंबई

सन २०२०-२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न आणि खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षाकरिता म्हणजेच २०२१-२२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७ कोटी इतके आहे. सन २०२०-२१ या वर्षाचे भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३०१.३३ कोटी असून तो सुधारित करून १७९.०३ कोटी एवढे अपेक्षित आहे. तर सन २०२१-२२ या वर्षासाठी भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज २४४.०१ कोटी इतके आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ७३३.७७ कोटींचा, तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता.

शासनाकडून १२६८.६४ कोटी येणे बाकी

१ जानेवारी २०१६ पासून पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याचे राज्य सरकारकडून ८०० कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये प्राथमिक शाळांच्या खर्चापोटी अनुज्ञेय ५० टक्के अनुदान ४६८.६४ कोटी अपेक्षित असल्याने सन २०२१-२२ च्या महसुली उत्पन्नाखाली १२६८.६४ कोटी इतकी तरतूद प्राथमिक शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान म्हणून प्रस्तावित आहे.

सहआयुक्त सॅनिटाईझर प्यायले

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणारे सहआयुक्त रमेश पवार यावेळी पाण्याऐवजी सॅनिटायझर पिल्याने अर्थसंकल्प सादर करण्यास थोडा उशीर झाला. सॅनिटायझर गेल्याने पवार तोंड धुण्यासाठी सभागृहाबाहेर गेले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. सभागृहामधील उपस्थितांना काही माहीत होण्याच्या आतच पवार पुन्हा सभागृहात आले आणि अर्थसंकल्पाचे वाचन केले.

अर्थसंकल्पात काय?

  1. कोव्हिड १९ आरोग्यविषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठा - १५.९० कोटी
  2. पालिका शाळांचे मुंबई पब्लिक स्कूल असे नाव बदलून पुन्हा सुरु करणार - ५ लाख
  3. सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे - २ कोटी
  4. उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता करिअर टेन लॅब - २१.१० लाख

Last Updated : Feb 3, 2021, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.